Breaking

6/recent/ticker-posts

विद्युत तारांची ठिणगी पडून ३० एकरातील तोडणीला आलेला ऊस जळून खाक.

प्रकाशक: श्री. संतोष वाघमारे 

म्हैसगाव दि.२३ | म्हैसगाव (ता.माढा) येथील ऊसाच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत तारांची ठिणगी पडून येथील ८ शेतकऱ्यांचा मिळून २५ ते ३० एकर ऊस जळाला आहे. उसासोबतच सिंचनासाठी केलेली ड्रिप सुद्धा आगीत भस्मसात झाली. जळीत ऊसाची लवकरच ऊसतोड सुरू होणार होती. ही घटना दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली.


घटनेची माहिती मिळताच गावकमगार तलाठी श्री. गौरव कुलकर्णी, कोतवाल महादेव मदने यांनी घटनास्थळी जाऊन जळीत ऊसाची आणि ड्रीपची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे. सुमारे १० हेक्टर पेक्षा जास्त ऊसाचे क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी पडले असल्याचे निदर्शनास येते.


या शेतकऱ्यांचे झाले नुकसान.

सुर्यभान जोती खारे, शिवाजी नारायण खारे, आण्णासाहेब नारायण खारे, सुनिल हरिबा खारे, दिलीप हरिबा खारे, सुर्यभान जोती खारे व इतर, कालिदास नवनाथ जगताप, दैवशाला कालिदास जगताप, शशिकांत किसन जगताप, आदम जमाल शेख आदी शेतकऱ्यांचा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असून महावितरणच्या हलगर्जीपणामुळे नुकसान झाले असल्याचा शेतकऱ्यांचा सुर दिसून आला. महावितरणने नुकसान भरपाई नाही दिल्यास संबंधित शेतकरी महावितरणच्या विरोधात ग्राहक मंचात दाद मागण्याच्या तयारीत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

---------------०-----------०--------------------

बातमी / जाहिरात : 9527271389