Breaking

6/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना: कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात

सोलापूर जनसंवाद


म्हैसगाव दि. ३: कुर्डूवाडी - बार्शी रोडवर कार आणि मोटारसायकलचा चिंचगाव येथे भीषण अपघात झाला. जखमीमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि लहान मुलाचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी बार्शी येथे हलवण्यात आले आहे. ही घटना सायंकाळी ६ च्या दरम्यान घडली.


सविस्तर हकीकत अशी की, भोइंजे ता.बार्शी येथील व्यक्ती (नाव माहीत नाही) मोटार सायकलवर (एम.एच.४२ ए.डब्ल्यू.७९६१) लहान मुलासह जात असताना  बार्शीकडून कुर्डूवाडीच्या दिशेने ह्युंदाई कंपनीची कार (एम.एच १२ एस.एल.२४१२) भरधाव वेगाने जात होती. कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने मोटारसायकलला अक्षरशः चिरडले. कारचा वेग इतका होता की, मोरसायकलचा चुरा झाला. दोन ते तीन वेळा कार पलटी झाल्याने कारमधील महिला जखमी झाल्या आहेत. यामध्ये मोटारसायकलस्वार आणि अंदाजे १०-१२ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. 


ह्युंदाई कारमधील महिलांनाही जबर मार लागला आहे. बाजूलाच क्रिकेटचे मैदान असल्याने क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी लगेच धाव घेतली आणि कार मधील महिलांना तत्काळ बाहेर काढले. कार चालक मद्य प्राशन करून कार चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.


कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे पो.हे.कॉ श्री. मारकड, हे.काँ. मनोज बागडे, हे.कॉ. श्री.कांबळे आदींनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून कार चालकास पोलिस ठाण्यात घेऊन गेले आहेत. बातमी प्रकाशित होईपर्यंत गुन्हा नोंद करण्यात आला नसून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी नॅशनल हायवे पोलिस पोसई एम.बी. सोनार, हेकॉ. श्री.शिंदे, हेकॉ.श्री. माने यांनीही भेट देऊन माहिती घेतली. 

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००

खबर, बातमी आणि जाहिरातीसाठी: ९५२७२७१३८९