Breaking

6/recent/ticker-posts

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी, पहाटे 'या वेळेपर्यंत' दुकाने, बार सुरू राहणार.

Solapur jansanvad

सोलापूर दि.22 (जिमाका) :- सोलापूर जिल्हयातील पुढील अनुज्ञप्त्याच्या आस्थापना निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी उघडया  ठेवण्यासाठी महाराष्ट्र मद्यनिषेध कायदा 1949 चे कलम (139) (1) (सी) व कलम 143 (दोन) (एच1) (iv) अन्वये व शासनाचे प्राप्त निर्देशानुसार मद्यविक्रीसाठी निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी उघड्या ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे.


अनुज्ञप्त्ती प्रकार एफएल -2 (विदेशी मद्य किरकोळ विक्री चे दुकान ) दि.24 ,25 ,31 डिसेंबर 2023  शिथिल करावयाचा कालावधी  रात्री 10.30 ते दुसऱ्यादिवशी पहाटे 1.00 वाजेपर्यंत.


अनुज्ञप्ती प्रकार  उच्च दर्जाची व अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेली एफएल 2 अनुज्ञप्ती दि. 24, 25, 31 डिसेंबर 2023  शिथिल करण्याचा कालावधी रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1.00 वाजेपर्यंत.


अनुज्ञप्ती प्रकार  एफएलडब्ल्यू 2 ,  दिनांक 24, 25, 31 डिसेंबर 2023  शिथिल करावयाचा कालावधी रात्री 10.30 ते दुसऱ्यादिवशी पहाटे 1.00 वाजेपर्यंत.


अनुज्ञप्ती प्रकार  एफएल बीआर 2 ,दिनांक 24,25,31 डिसेंबर 2023  शिथिल करावयाचा कालावधी रात्री 10.30 ते दुसऱ्यादिवशी पहाटे 1.00 वाजेपर्यंत.


अनुज्ञप्ती प्रकार , एफएल 3 (परवाना कक्ष),  दिनांक 24,25,31 डिसेंबर 2023, शिथिल करावयाचा कालावधी, पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रा व्यतिरिक्त रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5.00 वाजेपर्यंत आणि पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 1.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5.00 वा. पर्यंत.


अनुज्ञप्ती प्रकार, एफएल  4 क्लब अनुज्ञप्ती, दिनांक 24, 25, 31 डिसेंबर 2023 शिथिल करावयाचा कालावधी, पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रा व्यतिरिक्त रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5.00 वाजेपर्यंत आणि पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 1.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5.00 वा. पर्यंत.


अनुज्ञप्ती प्रकार  नमुना ई (बिअर बार) , दिनांक 24, 25, 31 डिसेंबर 2023, शिथिल करावयाचा कालावधी रात्री 12 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5.00 वाजे पर्यंत .


अनुज्ञप्ती प्रकार  -  ई 2 , दिनांक 24, 25, 31 डिसेंबर 2023, शिथिल करावयाचा कालावधी रात्री 12 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5.00 वाजे पर्यंत .


अनुज्ञप्ती प्रकार  -  सी एल 3, दिनांक 24, 25, 31 डिसेंबर 2023, शिथिल करावयाचा कालावधी महानगरपालिका तसेच अ,व ब वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्त्यांसाठी रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी  पहाटे 1.00 वाजेपर्यंत  व इतर ठिकाणी रात्री 10.00 ते दुसऱ्या दिवशी 1.00 वाजेपर्यंत .

असे आदेश  राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांनी दिले आहेत आले आहेत.