Breaking

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची मुदत 'या' तारखेपर्यंत

 

Jansanvad

           सोलापूर दि. 13 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती या प्रवर्गातील विदयार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व विद्यावेतन या योजनांचा लाभ देण्यात येतो. सदर यासेजनेचा लाभ घेण्यासाठी mahadbt.mahait.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली असून, दि.30 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येणार असल्याची समाज कल्याणचे सहा. आयुक्त नागनाथ चौगुले यांनी दिली.


                    सदर प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा दिनांक 03 ऑक्टोबर 2023 पासून सुरु करण्यात आलेली आहे. जिल्हयातील कनिष्ठ,वरिष्ठ व्यावसायिक, बिगर व्यावसायिक, तांत्रिक या सर्व महाविद्यालयांनी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फि व परिक्षा फि, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, विदयावेतन या योजनांचे नवीन तसेच नुतनीकरणाचे अर्ज विद्यार्थ्यांकडुन तात्काळ भरुन घ्यावेत. महाविद्यालय स्तरावरील सद्यस्थितीत प्रलंबित असलेले सर्व अर्ज निकाली काढण्याकरिता दि. 30 एप्रिल 2024 पर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मुदतवाढ दिलेल्या कालावधीत सन 2023-24 तसेच त्यापुर्वीचे प्रलंबित असलेले अर्ज ऑनलाईन निकाली काढण्यात यावेत, सदर अर्ज विहीत वेळेत निकाली न काढल्यास असे अर्ज प्रणालीतून कायम स्वरुपी रद्द होतील यांची सर्वांनी दखल घ्यावी.


              सदर योजनेच्या लाभापासुन मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य व शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणारे कर्मचारी यांची राहिल, असे आवाहनही समाज कल्याणचे सहा. आयुक्त चौगुले यांनी केले आहे.