Breaking

6/recent/ticker-posts

पर्यावरण संरक्षण कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करून सन उत्सव साजरे करावेत - पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे

 

कुर्डूवाडी दि.१० : महात्मा ज्योतिबा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद, हनुमान जयंती, महावीर जयंती आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शांतता अबाधित राहावी, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जनजागृती करण्याकरिता कुर्डूवाडी येथे शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.सुरेश चिल्लावार यांनी आयोजित केली होती.


बैठकीसाठी प्रशासनाच्या वतीने पोलिस अधीक्षक श्री.शिरीष सरदेशपांडे, उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रियांका आंबेकर, उप विभागीय पोलिस अधिकारी श्री.अजित पाटील, माढा तहसीलदार श्री.विनोद रणवरे,  कुर्डूवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री.लक्ष्मण राठोड, महावितरणचे कार्यकारी अधिकारी श्री.सूरज मोहिते, कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.सुरेश चिल्लावार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 


हेही वाचा: दिग्विजय बागल यांचेसह १७ जणांवर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करन्याचे कोर्टाने दिले आदेश


सन उत्सव शांततेने आणि वेगवेगळ्या धर्माच्या आदर ठेऊन शांततेत जयंती पार पाडावी. कुर्डूवाडी शहरातील सर्व जाती धर्माचे नागरिक एकत्र येऊन सर्व सन उत्सव शांततेत साजरे करतात म्हणून श्री.सरदेशपांडे यांनी कुर्डूवाडीकरांचे कौतुक करून यापुढेही शांततेमध्ये जयंती, उत्सव साजरे करावेत. समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या विघ्नसंतोषी व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन सरदेशपांडे यांनी केले.

सन उत्सवांचा आनंद घेतला पाहिजे, मोठे मोठ्या डिजेमधून आनंद मिळतो असे नाही. डीजे लावताना रुग्ण, वृद्ध व्यक्ती, लहान बाळांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन आनंदाने उत्सव साजरे करावेत असे आवाहन श्री.सरदेशपांडे यांनी केले.

दरम्यान, पोलिस प्रशासनाची भव्य इमारत जून अखेर पर्यंत पूर्ण होणार असून लवकरच पोलिस ठाण्याचा कारभार प्रशस्त इमारतीतून होणार असल्याचे आणि नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. 

नागरिकांना समस्या विचारण्यात आल्यानंतर प्रामुख्याने मिरवणुकीसाठी परवानगी स्थानिक पोलीस ठाण्यातूनच मिळावी अशी नागरिकांनी मागणी केली. त्याचसोबत ऐन मिरवणुकीवेळी वीज खंडित होत असल्याची तक्रार महावितरणकडे करण्यात आली. महा वितरणाच्या अधिकाऱ्यांनीही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

वीज वितरण यंत्रणा, पोलिस यंत्रणा, पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या अशा अनेक समस्यांवर चर्चा झाली. संबंधित विभाग प्रमुख उपस्थित असल्याने त्यांनी सर्व समस्या लवकरात लवकर सोडवू आहे आश्वासन दिल्याने शिवजयंतीच्या मिरवणुकीवेळी आलेल्या समस्या यावेळी येणार नाहीत याची काळजी घेणार असल्याचे विभाग प्रमुखांनी सांगितले.

बैठकीसाठी कुर्डूवाडी शहर आणि कुर्डूवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस पाटील, पत्रकार, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क

95 2727 1389