Breaking

6/recent/ticker-posts

फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे , बँक वसूली प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी राष्ट्रीय लोक आदालतीचे आयोजन


         सोलापूर दि. 08 (जिमाका) :- राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात दि.5 मे 2024 रोजी 10.30 वाजता राष्ट्रीय लोक आदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधि सेवा प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांनी दिली.

          या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, बँक वसूली प्रकणे, कलम 138 एन.आय.ॲक्ट, अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, भूसंपादन बाबतची प्रकरणे तसेच बँक ,सहकारी पतसंस्था यांच्या वसूलीच्या दरखास्त, बँक, लवाद दरखास्त इत्यादी प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आलेले आहे.

            तरी या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी आपापली प्रकरणे तातडीने मिटवून लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा विधि सेवा प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांनी केले आहे.

०००

जाहिरात आणि बातमीसाठी संपर्क:

9527271389