Breaking

6/recent/ticker-posts

सुरक्षा अधिकाऱ्यांच्या जाचास कंटाळून युवकाची आत्महत्या.



आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांची नावे व्हॉट्सअप स्टेटसला  ठेवल्याने तालुक्यात खळबळ.

म्हैसगाव/माढा - विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड, म्हैसगाव (ता.माढा) या साखर कारखान्यामधील सुरक्षा अधिकारी मानसिक छळ करीत असल्याचा असल्याचा व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन येथील सुरक्षा रक्षक अजिंक्य यादव (वय २२ वर्षे) रा.घाटने (ता.माढा) याने कारखाना परिसरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवार दि.१७ रोजी पहाटे ३ च्या दरम्यान घडली.


अजिंक्य यादव हा म्हैसगावस्थित विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड या साखर कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. सुरक्षा एजन्सीचे सुरक्षा अधिकारी सचिन शिंदे, विकास वाघमोडे,  अनिल कांबळे आणि घाटनेचे (ता. माढा) सरपंच पती उमेश कदम हे मानसिक त्रास देत असून त्यांना जन्मठेप झाली पाहिजे असा मजकूर स्टेटसवर लिहून ठेऊन येथील सुरक्षा रक्षक अजिंक्य यादव याने पहाटेच्या सुमारास रेल्वे लाईन नजिक झाडाला  गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.


मुलाचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या मोबाइल स्टेटसवरून सदरील घटनेची फिर्याद मयताचे वडील नामदेव संदीपान यादव यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. श्रीनिवास पाटील यांच्याकडून पंधरा हजार, चेतन महादेव बागल मालक पान शॉप आठ हजार चारशे, विजय बागल चार हजार, अक्षय महादेव कदम उर्फ अण्णा पाच हजार, हरिभाऊ लोंढे १९ हजार पाचशे येणे असल्याचे व्हॉट्सअप स्टेटस आणि फिर्यादीमध्ये नमूद आहे.


मानसिक छळ आणि उसनवारी रक्कम स्टेटसला ठेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर व्हॉट्सअप स्टेटस बाबत तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू असून घटनेचा तपास सूरू आहे. पोलिस तपासाअंती सर्वकाही समोर येणार आहे.