Breaking

6/recent/ticker-posts

गुरुवर्य नानासाहेब माऊली विरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवरूद्र प्रतिष्ठानच्या वतीने १७५ जणांचे रक्तदान.



टेंभुर्णी प्रतिनिधी : आढेगाव (ता.माढा) येथील शिवरूद्र प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा गुरुवर्य नानासाहेब (माऊली) विरकर (Mauli Nanasaheb Virkar) यांच्या २१ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १७५ जणांनी रक्तदान केले.


अध्यात्मामध्ये अल्पावधीत लोकप्रिय आणि प्रसिध्द झालेले माढा तालुक्याचे सुपुत्र आढेगावचे (विरकर वस्ती) रहिवाशी असलेले नानासाहेब (माऊली) विरकर यांनी सामाजिक भावनेतून शिवरूद्र प्रतिष्ठानची (Shivrudra Pratishthan) स्थापना केली आहे. संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी विविध उपक्रम राबविले जातात. यापैकी रक्तदान हा एक उपक्रम आहे. 


सोलापूर जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील अनेक भक्तगण वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उपस्थित होते. वयाच्या २१ व्या वर्षी अध्यात्मिक ज्ञान आत्मसात करून अध्यात्मिक ज्ञानाचा वापर जनकल्याणासाठी करणारे माऊली यांचे सानिध्य लाभावे यासाठी आढेगाव येथील विरकर वस्ती येथे भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसते.


सांगोला येथील रेवनील ब्लड सेंटर सहकार्य लाभले, यावेळी ब्लड सेंटरचे डॉ.सोमेश यावलकर, लॅब टेक्निशियन शिवतेज तेली, अनिकेत गोंजारी, प्रथमेश गुंजकर यांनी रक्त जमा करण्याचे कार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.प्रशांत पानसरे, श्री.बापूसाहेब विरकर, श्री.दिपक तरंगे, सूरज पंडित, सूरज काळे, गोरख पडवळकर, वासुदेव विरकर, भैया गाडे (सरपंच) बापू कोळेकर, साधू पडवळकर आदींनी परिश्रम घेतले.


केक, हारतुरे, मान-सन्मान यापेक्षा रक्तदान हीच मोठी शुभेच्छा असल्याचे यावेळी माउलींनी सांगितले. रक्तदान शिबिर आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ होती. प्रत्येक वर्षी अनेक पटींनी रक्तदात्यांची संख्या वाढणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. रक्तदानासारखे अत्यावश्यक असा उपक्रम राबवून समाजकार्य केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी माऊलींचे कौतुक केले.